हवाई वाहतुकीत भारताची जगात तिसऱ्या स्थानावर झेप; गोव्यात मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

वृत्तसंस्था

पणजी : भारताने हवाई वाहतूक क्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापुढे देखील भारत हवाई वाहतूक क्षेत्रात अशीच उत्तुंग कामगिरी करत राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. Inauguration of Manohar International Airport in Goa

गोव्यातील मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात मोदी बोलत होते. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की गोव्यासारख्या पर्यटन हब साठी केवळ डंबोलिन सारखा एक स्थानिक विमानतळ असून चालणार नाही हे मनोहर पर्रीकर यांनी सन 2000 पूर्वीच ओळखले होते. मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानाच तयार करण्यात आला होता. परंतु, 2004 मध्ये अटलजींचे सरकार गेल्यानंतर हे काम पुढच्या सरकारांनी ठप्प करून ठेवले होते. त्या सरकारांचा विचार असा होता की हवाई वाहतूक ही फक्त लक्झरी आहे आणि ती फक्त उच्चभ्रूंसाठी आहे, असे शरसंधान मोदींनी साधले.

परंतु 2014 मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर आमच्या सरकारने हवाई वाहतूक सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना देखील उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. हवाई वाहतुकीसाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा तयार केल्या.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी व्हिसाचे नियम सोपे आणि शिथिल केले आणि म्हणूनच आज हवाई वाहतूक क्षेत्रात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली. या कार्यक्रमापूर्वी मोदींनी गोव्यातील आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभात देखील सहभाग घेतला.

Inauguration of Manohar International Airport in Goa

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात