विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लागले असले तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटला असून याचा फायदा-तोटा नक्की कोणाला होणार यावर चर्चा रंगल्या आहेत.In Uttar Pradesh, the voter turnout has come down, discussions on who will benefit and who will lose
उत्तर प्रदेशची निवडणूक हाय प्रोफाईल बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळ भाजपच्या वतीने या निवडणुकीत उतरले आहे. दुसऱ्या बाजुला समाजवादी पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. अखिलेश यादव यांच्या सभांना गर्दी होत आहे. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी रोड शो करत आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनीही निवडणुकीत रंग भरला आहे. तरीही आत्तापर्यंत निवडणूक झालेल्या २९२ जागांपैैकी १५० जागांवर कमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अयोध्या, अमेठी, रायबरेली आणि इतर मतदारसंघांचा समावेश आहे. या १५० जागांपैकी ४० पेक्षा जास्त ठिकाणी ९ टक्क्यांपर्यंत कमी मतदान झाले आहे.
१०९ जागांवर १ ते ७ टक्क्यांपर्यंत जास्त मतदानही झाले आहे. ३० पेक्षा जास्त जागांवर २०१७ मध्ये जसे मतदान झाले होते त्यात यंदाही काही बदल झालेला नाही.पश्चिम उत्तर प्रदेशमधील मतदारसंघ आणि अखिलेश यादव लढत असेल्या करहाल मतदारसंघात २०१७ मधील मतदानाच्या तुलनेत ७ टक्के जास्त मतदान झाले आहे.
लखीमपूर खेरी मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. या मतदारसंघात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंदोलनात ४ शेतकरी मारले गेले होते. मतदानाच्या झालेल्या सर्व ५ टप्प्यांतील आकडेवारी एकत्र केली, तर २०१७ च्या मतदानाच्या तुलनेत यंदा फक्त १.०८ टक्के मतदान कमी झाले आहे.
कमी मतदान झाल्याने त्याचा नक्की अर्थ काय काढायचा असा प्रश्न राजकीय विश्लेषकांसमोर पडला आहे. सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी असल्यास कमी मतदान होते असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर विरोधकांवर विश्वास नसल्यानेच कमी मतदान झाल्याचे भाजपच्या वर्तुळात म्हटले जात आहे. याचा निश्चित अर्थ काय याचा फैसला १० मार्च रोजी मतमोजणी झाल्यावरच समजणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App