विशेष प्रतिनिधी
लखनऊ : विरोधकांकडून टीका केली जात असली तरी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचाच जलवा असल्याचे एबीपी-सीव्होटरच्या सर्व्हेत म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी योगींना सर्वाधिक पसंती असून राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.In Uttar Pradesh, only Yogi is the Jalwa, the most preferred candidate for the Chief Minister’s post, again the BJP government in the state
उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र २०१७ च्या तुलनेत भाजपच्या ६० ते ७० जागा घटू शकतात. भाजपला सर्वाधिक ४१ टक्के मतं मिळतील. समाजवादी पक्षाला ३२ टक्के, बसपला १५ टक्के मतदान होईल. प्रियंका गांधींनी पूर्ण जोर लावूनही काँग्रेसला केवळ ६ टक्केच मतं मिळू शकतात.
भाजपला २४१ ते २४९, समाजवादी पक्षाला १३० ते १३८, बहुजन समाज पक्षाला १५ ते १९ आणि काँग्रेसला केवळ ३ ते ७ मिळणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक ४१ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. अखिलेश यादव यांना ३१ टक्क, ेमायावती यांना १७ टक्के आणि प्रियंका गांधी यांना केवळ ४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानंदेखील संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अखिलेश यादव, मायावती यांच्यासह लहान पक्षदेखील कामाला लागले आहेत. काँग्रेसने या निवडणुकीची जबाबदारी प्रियंका गांधींकडे दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App