पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री पत्रापत्री करत आहे. मात्र, धडाकेबाज निर्णय घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे.In Uttar Pradesh, journalists and their families will get free vaccines, says Yogi Adityanath
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री पत्रापत्री करत आहे. मात्र, धडाकेबाज निर्णय घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वेगळी लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला. माध्यमांच्या कार्यालयात जाऊन लसीकरण करण्यासही सांगण्यात आले आहे.
इकडे महाराष्ट्रात मात्र पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी अनेक मंत्री पत्रापत्री करत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
पत्रकार बातमीदारीच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतो. त्यामुळं त्यांना संसगार्चा धोका अधिक आहे. त्यांचे कुटुंबीय देखील धोक्यात आहेत. त्यामुळं या सर्व पत्रकार मंडळींना ‘फ्रंटलाईन वर्कर’ दर्जा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करण्यात यावं, असं थोरात यांनी पत्रात म्हटलं आहे.
तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांतील सरकारनं त्या-त्या राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा दिला आहे. तिथं पत्रकारांचं लसीकरणही प्राधान्यानं करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही निर्णय घ्यावा, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.
अधिस्वीकृती धारक पत्रकार वगळता राज्यातील अन्य पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेतही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळं पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अधिस्वीकृती धारक पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाºया पत्रकारांची संख्या कितीतरी अधिक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App