उत्तर प्रदेशात भाजप १२०, तर सपा ८२ जागांवर आघाडीवर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजप १२०, तर सपा ८२ जागांवर आघाडीवर होती. पंजाबमध्ये आप ४५ जागांवर आघाडीवर होती. मणिपूरमध्ये काँग्रेस आघाडीवर होती.उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे.गोव्यात काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर जाऊन बहुमताकडे वाटचाल करत होती. In Uttar Pradesh, BJP is leading with 120 seats, while SP is leading with 82 seats

पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. क्षणाक्षणाला आघाडी पिछाडीचे चित्र बदलत आहे.

यूपीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने १०० तर सपाने ८० ठिकाणी आगेकूच केली आहे. सकाळी पावणे नऊ वाजता उत्तर प्रदेशातील स्थितीत थोडा बदल दिसून आला. ट्रेंडमध्ये, भाजपने एकदा ११० जागांचा आकडा गाठला आणि १०० पर्यंत घसरला, तर सपा १५ मिनिटांत ६० वरून ८० जागांवर पोहोचला.



सुरुवातीच्या १५ मिनिटांत भाजपने ७२ जागांचा आकडा गाठला. तर सपाही ४४ वर पोहोचली आहे. बसपाला तीन जागा मिळत आहेत. ४०३ जागांपैकी आतापर्यंत १२० हून अधिक जागांसाठी कल प्राप्त झाला आहे. ‘आप’ २५ जागांवर पुढे आहे.

पंजाब : आम आदमी पार्टीची २५ जागांवर आघाडी

पंजाब ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस १८ जागांवर पुढे आहे. अकाली दल चार जागांवर आघाडीवर आहे. अन्य एका जागेवर आघाडीवर आहेत.

उत्तराखंडमध्ये काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर

उत्तराखंडमध्ये ‘आप’ ने खाते उघडले आहे. येथे आम आदमी पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे, भाजप ३० आणि काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर आहे.

गोव्यात काँग्रेस २० जागांवर पुढे

गोव्यातील ४० आणि मणिपूरमधील ६० जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्चला दोन टप्प्यात मतदान झाले. मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात एकूण २६५ उमेदवार रिंगणात होते, तर गोव्यात ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात होते.

गोव्यात काँग्रेस २० जागांवर पुढे आहे. गोव्यात भाजपची काँग्रेसशी निकराची लढत होत आहे. येथील सर्व ४० जागांचे प्रारंभिक कल बाहेर आले आहेत. काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे तर भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसी आघाडी चार जागांवर आघाडीवर आहे.

मणिपूरमध्ये काँग्रेसची पिछेहाट

मणिपूरमध्ये काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. येथे २३ जागांवर सुरुवातीचे कल दिसू लागले आहेत. भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

In Uttar Pradesh, BJP is leading with 120 seats, while SP is leading with 82 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात