भारताचा मानवतावादाचा आदर्श, भारावलेल्या पाकिस्तानी महिलेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार


विशेष प्रतिनिधी

कीव्ह (युक्रेन) : रशियाबरोबरच्या संघर्षात युध्दभूमी झालेल्या युक्रेनमध्ये भारताने आपल्या मानवतावादी भूमिकेने आदर्श निर्माण केला आहे. भारताने एका पाकिस्तानी महिलेलाही युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. मी कीव्हस्थित भारतीय दूतावासासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. आमची मदत करत त्यांनी आम्हाला युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचे या महिलेने म्हटले आहे.India’s ideal of humanitarianism, overwhelmed Pakistani woman thanked Prime Minister Modi

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा १४ वा दिवस आहे. युद्धभूमीत अडकून पडलेले युक्रेनचे सामान्य नागरिक आणि परदेशी नागरिक इथून बाहेर पडण्यासाठी आपल्या जीव मुठीत घेऊन प्रयत्न करत आहेत. भारतासहीत इतर देशही युक्रेनमधून आपापल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘



ऑपरेशन गंगा’ अंतर्गत भारतानं आतापर्यंत १८ हजारांहून अधिक जणांची सुटका करून त्यांना भारतात आणण्यात आलंय. याच दरम्यान पाकिस्तानच्या एका महिलेलाही भारताकडून मदतीचा हात मिळाला. यामुळे भारावलेल्या महिलेनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत.

या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत महिलेनं आपण पाकिस्तानी नागरिक असून आपलं नाव अस्मा शरीफ असल्याचं म्हटले आहे. अस्माने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये संकटात अडकलेले असताना भारतीय अधिकाऱ्यांची मदत मिळाल्यामुळेच मी सुरक्षितरित्या बाहेर पडू शकले. भारतीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं युक्रेनमधून बाहेर पडणारी अस्मा पश्चिम युक्रेनच्या मार्गावर आहे. लवकरच ती आपल्या घरी पोहचू शकेल.

रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये बिघडलेल्या परिस्थितीत युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांना सुखरुपपणे मायदेशात आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ राबवण्यात येत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ७५ विशेष नागरी उड्डाणांद्वारे १५,५२१ भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आलं

तर भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांतून जवळपास २५६७ जणांना युक्रेनमधून सुखरुपपणे बाहेर पडता आलं. सोबतच भारतानं आतापर्यंत ३२ टनांहून अधिक मदत साहित्य युक्रेनच्या शेजारील देशांना पाठविली आहे.

India’s ideal of humanitarianism, overwhelmed Pakistani woman thanked Prime Minister Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात