विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यात आश्चर्य घडले आहे. मुस्लिम धर्मातून चक्क हिंदू धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे. येथील १९ मुस्लिमांचा शुद्धीकरण समारंभ होऊन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आले. महंत यशवीर महाराजांनी गायत्री मंत्राचा जप करून तसेच हवन करून या सर्वांना हिंदू धर्माची दीक्षा दिली.In Uttar Pradesh, 19 Hindus were purified and re-converted to Hinduism. Banjara brothers were forcibly converted.
आपले जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले होते, असे या लोकांनी सांगितले.धर्मांतर केलेले सर्व लोक तीन कुटुंबांचे सदस्य आहेत. १२ वर्षांपूर्वी शामली या मुस्लिमबहुल क्षेत्रात बंजारा समाजाच्या १९ लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले होते. महंत यशवीर महाराज म्हणाले की, १९ लोक हिंदू धर्म सोडून अन्य धर्मात गेले होते.
आता त्या सर्वांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश झाला आहे. ज्यात ७ महिला, ४ पुरुष आणि ४ मुलांचा समावेश आहे. या सर्व लोकांनी इस्लाम स्वीकारला होता, परंतु आता हे सर्व परत हिंदू झाले आहेत. या सर्वांचे धर्मांतर झाल्यानंतर त्यांचे नाव बदलून मुस्लिम नावे त्यांना देण्यात आली होती. पुन्हा हिंदू धर्मात आल्यानंतर त्यांची नावेही बदलण्यात येणार आहेत.
आम्हाला काही मुसलमान लोकांनी धमकावले होते, असे हिंदू धर्मात प्रवेश करणाऱ्या बंजारा बांधवांनी सांगितले. आम्हाला महंत यशवीर महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत, असेही या बंजारा बांधवांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App