मालदीव मध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षाला पहिल्या दीड महिन्यातच निवडणुकीत फटका; मालेच्या महापौर पदाची निवडणूक हरली!!

वृत्तसंस्था

माले : मालदीव मध्ये चीनधार्जिणे अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगाऊपणा करून मालदीवच्या पर्यटन उद्योगाला तर मोठा फटका बसलाच, पण मोहम्मद मोईज्जू सत्तेवर येऊन फक्त दीड महिना उलटल्यानंतर तिथे झालेल्या स्थानिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फटका बसला. मालेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोहम्मद मोईज्जू यांच्या विरोधातल्या मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार विजयी झाला. In the Maldives, the Chinese president was defeated in the first month and a half of the election

मालदीव मध्ये चीन धार्जिणे अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी सत्तेवर येतात त्यांच्या मंत्र्यांनी भारत विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. मोहम्मद मोईज्जू 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाऊन आले. मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून त्यांना टार्गेट केले. पण, त्यामुळे मालदीव मधले वातावरण पूर्ण फिरले. तीन मंत्र्यांना बडतर्फ करावे लागले.

त्यानंतर आज हा माले शहराच्या महापौर पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कुडूस अहमद अजीम निवडून आले. मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मालदीव मध्ये अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी चीन धार्जिणी भूमिका घेतल्या बरोबर अवघ्या दीड महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला जनतेने नाकारून चांगलाच फटका दिला.

In the Maldives, the Chinese president was defeated in the first month and a half of the election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात