एमएमआरडीएने या जोडरस्त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bandra Fort मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे वांद्रे (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी वांद्रे किल्ल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू (वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू) प्रकल्पाचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास मुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता देऊन एमएमआरडीएने या जोडरस्त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले.Bandra Fort
वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर व शास्त्रीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या कामासाठी बेस्ट बस डेपोची जागा हस्तांतरण करण्याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सांताक्रूझ (पश्चिम) येथील दौलतनगर येथील बेस्टच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबतही मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास आणि वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या प्लॉट नं. 7 व 8 वरील शास्त्रीनगर व कुरेशी नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आल्या. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींसाठी विशेष प्रयोजन संस्था (SPV) तयार करण्याचे तसेच या इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून त्यानंतर पाडकाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App