वृत्तसंस्था
कुरुक्षेत्र : हरियाणातील ( Haryana ) विधानसभेच्या 90 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरुक्षेत्र येथे पहिली सभा घेतली. ते म्हणाले की, काँग्रेसचे राजेशाही (गांधी) घराणे आरक्षण रद्द करणार आहे. पण, जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत मी एक टक्काही आरक्षणाची लुट होऊ देणार नाही.
पंतप्रधानांनी हरियाणातील जनतेला इशारा दिला की, येथे काँग्रेसचे सरकार आले तर त्यांची अवस्थाही हिमाचलसारखी होईल. जिथे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही पगार सोडावा लागतो.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे. या योजना कर्नाटक आणि तेलंगणामध्ये राबविण्याचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले. तेलंगणात अवघ्या काही महिन्यांत 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं मोदी म्हणाले. काँग्रेसवाल्यांनी बुडून मरायला हवे. शेतकऱ्यांच्या मृत्यूचे पाप त्यांच्यावर आहे. हरियाणात भाजप सरकार 24 पिकांवर एमएसपी देत आहे.
या रॅलीत हरियाणाच्या जीटी रोड बेल्टवर असलेल्या 6 जिल्ह्यांतील 23 विधानसभा जागांचे उमेदवारही उपस्थित होते. हे कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला, पंचकुला, यमुनानगर आणि कैथल येथील होते. हरियाणा निवडणुकीसाठी 12 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
काँग्रेसने वन रँक वन पेन्शनला प्रलंबित ठेवले
नरेंद्र मोदी म्हणाले- काँग्रेसने शूर जवानांचाही विश्वासघात केला आहे. भाजपने वन पेन्शन वन योजना लागू केली. त्यामुळे हरियाणाच्या दीड लाख सैनिकांना करोडो रुपयांचा फायदा झाला. काँग्रेसने अनेक दशके प्रलंबित ठेवले होते.
तिसऱ्या टर्ममध्येही आम्ही त्यात सुधारणा केली. ऑक्टोबरपासून सैनिकांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. इथे येण्यापूर्वी मी जम्मू-काश्मीरमध्ये होतो. तिथे काँग्रेस पक्ष कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा संकल्प करत आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? असे पाप करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा झाली पाहिजे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत हरियाणाच्या शूर जवानांवर दहशतवादी दगडफेक आणि गोळीबार करत असत. माझी हरियाणाची शूर मुले दर आठवड्याला तिरंग्यात लपेटून परत यायची. कलम 370 परत आणण्याला पाठिंबा देऊन काँग्रेसला तो काळ परत आणायचा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App