Goa Elections Results : गोव्यात डॉ. प्रमोद सावंत भाजपचे सरकार स्थापण्याच्या तयारीत; विजयानंतरही बाबूश मोन्सेरात मात्र नाराज!!

वृत्तसंस्था

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा बहुमतानिशी भाजपचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे भाजपचे विजयी झालेले उमेदवार बाबूश मोन्सेरात मात्र नाराज झाले आहेत. In Goa, Dr. Pramod Sawant preparing to form BJP government

गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी जोरदार टक्करही दिली. पण पणजी मतदार संघात त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात विजयी झाले.

या विजयानंतर देखील बाबूश मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपली नाराजी बोलून दाखवली ते म्हणाले, की ज्याअर्थी उत्पल पर्रिकर यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते मिळाली आहेत याचा अर्थच असा की भाजपच्या केडरने मला पक्षात स्वीकारलेले दिसत नाही. माझा विजय झाला असला तरी भाजपच्या केडरने मात्र उत्पल पर्रीकर यांच्यासाठी काम केल्याचे दिसून येत आहे.

बाबूश मोन्सेरात हे जरी नाराजी दर्शवत असले तरी प्रत्यक्षात भाजपच्या विजयामुळे पक्षांमध्ये उत्साह दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये भाजप सरकार स्थापन करून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष यांच्या साथीने सरकार चालवेल असे स्पष्ट केले आहे.

In Goa, Dr. Pramod Sawant preparing to form BJP government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात