विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळमध्ये काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे संकटमोचक केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांची कन्या पद्मजा करुणाकरन – वेणूगोपाल यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी गेल्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ करुणाकरण यांच्या कन्येने देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने केरळ काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांचा विद्यमान काँग्रेसशी कुठलाही संबंध उरलेला नाही, हे सिद्ध झाले आहे. In BJP Padmaja Karunakaran – Venugopal’s entry into the party
ए. के. अँटनी अजूनही हयात आहेत, पण वृद्धापकाळमुळे सध्या राजकीय दृष्ट्या ते रिटायर्ड आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच अनिल अँटनी यांनी गेल्याच वर्षी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला. त्यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा करूणाकरन – वेणुगोपाल यांनी देखील भाजपचाच रस्ता धरून त्रिशूर मधून उमेदवारीसाठी अपेक्षा ठेवली आहे.
#WATCH | Congress leader Padmaja Venugopal, daughter of Congress veteran and former Kerala Chief Minister K Karunakaran, joins the Bharatiya Janata Party in Delhi pic.twitter.com/mGXrJPEF2W — ANI (@ANI) March 7, 2024
#WATCH | Congress leader Padmaja Venugopal, daughter of Congress veteran and former Kerala Chief Minister K Karunakaran, joins the Bharatiya Janata Party in Delhi pic.twitter.com/mGXrJPEF2W
— ANI (@ANI) March 7, 2024
वास्तविक ए. के. अँटनी आणि करुणाकरन हे केरळ काँग्रेस मधले एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. ते नेहमी एकमेकांनाच “रिप्लेस” करून केरळचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री होत असत. दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या काँग्रेस हायकमांडचा नेहमी विश्वास संपादन करून उच्चपदे भूषवली होती. करुणाकरन हे तर राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह यांचे संकटमोचक मानले जात असत. काँग्रेस मधले राजकीय दृष्ट्या नाजूक आणि अडचणी विषयी सोडवण्यात त्यांचा हातखंडा होता.
अनिल अँटनी आणि पद्मजा करुणाकरन – वेणुगोपाल यांच्या रूपाने केरळ मधल्या एकेकाळच्या दोन दिग्गज प्रतिस्पर्धी नेत्यांचे वारस आता भाजप सारख्या एकाच पक्षात येऊन आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App