बिहारमध्ये भाजपमध्ये देखील खांदेपालट; सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी!!

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार – लालूप्रसाद यादव यांचे सरकार कोसळून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवे भाजप जदयु सरकार स्थापन होत असताना भाजपने पक्षांतर्गत खांदेपालट केला. In Bihar, too, a shift in the BJP; Samrat Chaudhary, Vijay Sinha as Deputy Chief Minister

नितीश कुमार यांच्या आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या रेणु देवी आणि तारा किशोर प्रसाद सिंह यांच्या ऐवजी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि विधानसभेतले आधीचे विरोधी पक्ष नेते विजय सिन्हा यांना बिहार भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि उपनेते पदी निवडले आहे.

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली त्यामुळे अर्थातच सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोन नेते नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

 

भाजपने गेल्या 5 वर्षांत केलेला हा दुसरा खांदेपालट आहे. नितीश कुमार यांच्याबरोबरच्या सर्वात आधीच्या मंत्रिमंडळात सुशील कुमार मोदी हे दीर्घकाळ उपमुख्यमंत्री राहिले. 2019 मध्ये सुशीलकुमार मोदी यांच्या ऐवजी भाजपने रेणू देवी आणि ताराकेश्वर प्रसाद सिंह यांना उपमुख्यमंत्री केले सुशील कुमार मोदी यांना राज्यसभेत सदस्य नेमले. हा भाजपचा पहिला खांदेपालट होता.

परंतु नितीश कुमार यांनी काहीच महिन्यांमध्ये भाजपशी युती तोडली आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी घरोबा करून नवीन सरकार बनवले. त्यामुळे त्यांनी तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री केले. पण आता त्यांचे दीड वर्षांमध्येच यादव परिवाराशी बिनसले आणि त्यांनी पुन्हा भाजपशी घरोबा केला आहे. भाजपशी घरोबा करताना त्यांनी भाजपचे दोन उपमुख्यमंत्री मान्य करून नवीन सरकार बनवण्याची तयारी चालवली आहे. भाजपने दुसऱ्यांदा पक्षांतर्गत खांदेपालट करत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्याची तयारी केली आहे.

In Bihar, too, a shift in the BJP; Samrat Chaudhary, Vijay Sinha as Deputy Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात