विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपली प्रतिमा निर्मिती केली. त्यातून ते निवडणुकीच्या राजकारणात तरी जवळपास अजिंक्य नेते बनले. निवडणुकीचे एक स्वतंत्र मोदी मॉडेलच तयार झाले आणि या मॉडेलमध्ये सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व आले. मोदींच्या पाठोपाठ अनेक नेते सोशल मीडियाच्या मागे लागले, पण त्यांना मोदींच्या एवढा सोशल मीडियाचा वापर प्रभावी करता आला नाही. पण तरी देखील काँग्रेस सारख्या मोदी विरोधी पक्षाने आता मोदींची “अंधभक्ती” करत बिहार मधल्या आपल्या इच्छुकांना सोशल मीडियाच्या नादी लावलेय.
वास्तविक सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते भाजपच्या सरचिटणीस पदापर्यंत प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम करणारे नेते होते. मोदींनी स्वतः जेवढ्या निवडणुका लढविल्या, त्यापेक्षा त्यांनी इतरांना निवडणुकीच्या मैदानात लढण्यासाठी परिणामकारक मदत केली होती. ती प्रत्यक्ष जमिनीस स्तरावर काम दाखवून केली होती. त्यामुळे मोदींसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा फक्त एक एडिशनल सोर्स ठरला. पण म्हणून मोदी फक्त सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे पुढे आले हे पूर्ण सत्य मानून चालण्यासारखे नसताना काँग्रेसने मात्र आपल्या इच्छुक उमेदवारांना सोशल मीडियाच्या नादी लावून त्याच्या अटी शर्ती त्यांच्यावर लादल्याची घटना बिहारमध्ये घडली.
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट हवे असेल, तर इच्छुकांच्या सोशल मीडिया फॉलोवर्सची संख्या तपासली जाईल. ती जर विशिष्ट भरली नाही तर त्यांना तिकीट मिळणार नाही, अशी अटच काँग्रेसच्या सेंट्रल वार रूमचे प्रमुख शशिकांत सेंथिल यांनी घातली. फेसबुक वर एक लाख तीस हजार, एक सॅंडल वर पन्नास हजार आणि इंस्टाग्राम वर किमान 30000 फॉलोवर्स असतील तरच इच्छुकांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल असे प्रेझेंटेशन त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत बिहारमध्ये दिले. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष जमिनी स्तरावर ठामपणे उभे राहून काम करा किंवा न करा, तुमचे सोशल मीडिया फॉलोवर्सच तुम्हाला उमेदवारी मिळवून देतील, असा अप्रत्यक्ष संदेश काँग्रेसने इच्छुकांना दिला. नेमकी हीच ती मोदींची काँग्रेस कडून होणारी “अंधभक्ती” ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App