बंगळुरूमध्ये कोरोनाबाधित असलेले तीन हजारांहून अधिक नागरिक गायब झाले आहेत. त्यांनी आपले मोबाईल फोनही बंद केले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे काम आता प्रशासनाला करावे लागणार आहे. अगोदरच कोरोनाच्या उपचाराचा भार असलेल्या प्रशासनावर हे नवे संकट आल्याचे कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोका यांनी सांगितले आहे. त्यांना तातडीने शोधण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत.In Bangalore, over 3,000 corona patient went missing and mobile phones were switched off
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : बंगळुरूमध्ये कोरोनाबाधित असलेले तीन हजारांहून अधिक नागरिक गायब झाले आहेत. त्यांनी आपले मोबाईल फोनही बंद केले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे काम आता प्रशासनाला करावे लागणार आहे.
अगोदरच कोरोनाच्या उपचाराचा भार असलेल्या प्रशासनावर हे नवे संकट आल्याचे कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोका यांनी सांगितले आहे. त्यांना तातडीने शोधण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत.
इतक्या मोठ्या संख्येने समाजात फिरत असलेले हे कोरोनाबाधित रोग संपूर्ण शहरात आणि राज्यातही पसरवित असल्याची भीतीही अशोका यांनी व्यक्त केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यात असलेल्या कोरोनाबाधितांना कसे शोधायचे याबाबत पोलीसही हतबल आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कर्नाटकात बुधवारी एकाच दिवशी ३९,०४७ नवे कोरोनाबाधित सापडले. २२९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बंगळुरूमधील २२,५९६ आहेत.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, गेल्या एक वर्षापासन हा प्रश्न आहे. अनेक कोरोनाबाधित कोरानाचे निदान झाल्यावर गायब होता. वास्तविक आम्ही त्यांना मोफत औषधोपचार देत असतो.
त्यातील ९० टक्यांहून अधिक ठणठणीत बरेही झाले आहेत. परंतु, या लोकांनी त्यांचे मोबाईलही बंद करून ठेवले असल्याने त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचविणेही अशक्य झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App