विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने नवी मुंबईकरांची झोप उडवली आहे. नवी मुंबईतील ऐरोली, दिघा गावात तर सर्वत्र रस्ते, गावे, पाडे, डोंगरावरील घरे, नगरे, नाल्यालगत असणारी वस्ती, खोलगट वस्ती जलमय झाली. साधारण ३ते ५ फूट पाणी साचले होते. आपल्याला दृश्य दिसूनं आली. रस्त्यावर, इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या फ्लोअरपर्यत पाणी साचले होते. दुकानें घरे यांना तर नद्याचे स्वरूप आले होते. संपूर्ण घरातील कपाट, बेड, सोफे, फ्रिज, मशीन, गॅस, सहित कपडे जीवनाश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली. In Airoli, Navi Mumbai Rain water entered houses, shops every where
नागरिक ३ दिवसापासून रात्रदिवस जागून काढत आहेत. पाऊस कमी होण्याचे वाट पाहत आहे, कारण पाणी कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती पुन्हा होते की काय ? अशी भीती पसरली. कारण २०० ते २५० मिमी पाऊस पडून रेकॉर्ड झाले. मुंबई पालिका सोबतच नवी मुंबई पालिकेने पावसाळी कामे केल्याचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये प्रचंड रोष, राग, संताप उसळत आहे. मते मागायला या, तेव्हा दाखवूच असे नागरिक बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App