तामिळनाडूत संघाच्या पथ संचलनांना सुप्रीम कोर्टाची परवानगी; द्रमूकच्या एम. के. स्टालिन सरकारला फटकारले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घातपाती संघटना नाही तर तामिळनाडू सरकारी आदेशाची “व्हिक्टीम” आहे. (RSS is a victim, not perpetual) त्यामुळे संघाला शांतपणे पथ संंचलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळकमच्या एम. के. स्टालिन सरकारलाच फटकारले आहे. In a setback to DMK govt, RSS gets SC nod to hold marches in Tamil Nadu

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तामिळनाडू वेगवेगळ्या शहरांमध्ये पथ संचलन करणार आहे. मात्र या पथ संंचालनाला तामिळनाडू सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवून परवानगी नाकारली होती. त्या विरोधात संघाचे प्रतिनिधी मद्रास हायकोर्टात गेले होते. मद्रास हायकोर्टाने संघाला पथ संचलनाची परवानगी दिली होती. परंतु तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमच्या एम. के. स्टालिन सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि संघावर तामिळनाडूत अशांतता माजवत असल्याचा आरोप केला होता. मात्र हा रोप सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणतीही घातपाती संघटना नव्हे, तर तामिळनाडू सरकारच्या आदेशाची व्हिक्टीम म्हणजे बाधित संघटना आहे. पण संघाला शांतपणे पथ संचलन करण्याचा अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तामिळनाडूमधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाला निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथ संचलन करू इच्छितो. सुप्रीम कोर्टाच्या आता आदेशानंतर संघ स्वयंसेवक पथ संचालनांच्या तयारीला लागले आहेत.

In a setback to DMK govt, RSS gets SC nod to hold marches in Tamil Nadu

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात