मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात एका ऑडिओ टेपमुळे भूकंप झाला आहे. इम्रान खान यांना पुरेशी मते मिळाली नव्हती तरीही लष्कराच्या पाठिंब्याने ते सत्तेवर आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरीयम यांना भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडविण्याचा कटही रचण्यात आला होता, असे या ऑडिओ टेपमध्ये म्हटले आहे.Imran Khan’s rise to power not with votes but with the support of army

पाकिस्तानातील प्रसिध्द शोध पत्रकार अहमद नूरानी यांनी ही टेप उघड केली आहे. नूरानी हे अत्यंत अभ्यासूपणे रिपोर्टिंग करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कधीही संशय घेतला जात नाही. या टेपची सत्यता पडताळण्यासाठी आणि टेप बनावट आहे असे कोणी म्हणू नये यासाठी त्यांनी अमेरिकेत फॉरेन्सिक तपासणी केली होती.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या करिष्म्यामुळे निवडून आले असे म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ या पक्षाला पुरेशी मतेही मिळाली नव्हती. तरीही लष्कराने त्यांना सत्तेवर बसविले.पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कट करून अडकविण्यात आल्याचेही या टेपवरून उघड झाले आहे.

यामध्ये पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार एका व्यक्तीी बोलताना म्हणत आहेत की शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाझ यांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. न्या. निसार या टेपमध्ये म्हणत आहेत की मी हे अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपल्याकडे दुर्देवाने न्यायाधीशांनाही लष्कराकडून आदेश घ्यावे लागतात. आता हे म्हणतात की नवाझ शरीफ यांना शिक्षा झालीच पाहिजे.

टेप उघड झाल्यावर न्या. निसार यांनीही आपलाच आवाज असल्याचे मान्य केले आहे. मात्र, अनेक आवाज एकत्र जोडले असल्याचा आरोपही केला आहे. मात्र, अमेरिकेतील फॉरेन्सिक कंपनीने ही टेप सत्य असल्याचे म्हटले आहे.टेपमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की पाकिस्तानातील न्याययंत्रणा स्वतंत्र नाही. त्यांच्यावरही लष्कराचा दबाव असतो.

२०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वीची ही टेप आहे. यावेळी नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार, चोरी आणि लष्कराला बदनाम केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर पनामा पेपर्स लिक झाले आणि शरीफ यांना दहा वर्षे तर त्यांची मुलगी मरियम यांना आठ वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर शरीफ हे लंडनला गेले. तेव्हापासून पाकिस्तानात परतले नाहीत. मरियम यांनी शिक्षेविरुध्द अपील केले आहे.

या टेपचा अगदी छोटासा हिस्सा समोर आला आहे. पाकिस्तानातील प्रसिध्द पत्रकार आणि यूट्यूबर अलिया शाह यांनी म्हटले आहे की, ही टेप दूर्लक्ष करण्यासारखी आहे हे समजण्याची चूक करू नका. पुढील काही दिवसांत संपूर्ण टेप समोर येईल. त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप येईल. स्वत:ला पवित्र समजणाºया लष्कराच्या अनेक गोष्टी उघड होतील. या टेपच्या छोट्याश भागानेही इम्रान आणि लष्कराची झोप उडाली आहे. लोकांना आता पूर्ण पटले आहे की नवाझ शरीफ यांना या दोघांनीच अडकविले होते.

Imran Khan’s rise to power not with votes but with the support of army

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात