वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एका भाषणादरम्यान इम्रान म्हणाले की, नरेंद्र मोदींची देशाबाहेर कोणतीही मालमत्ता नाही, पण आमच्या नेत्यांची इतर देशांमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे.Imran Khan again praises PM Modi Said- he has no assets abroad; Earlier, India was called self-respecting
इम्रान यांनी आपल्याच देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करत म्हटले की, आमच्या पंतप्रधानांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि कोट्यवधींचा व्यवसाय विदेशात आहे. त्यांच्या पत्नीचीही देशाबाहेर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या शेजारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किती मालमत्ता विदेशात आहे?
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाबाहेर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आणि व्यवसाय उभारले आहेत, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यांच्या मुलांकडे यूकेचे पासपोर्ट आहेत. ते काहीही उत्तर देऊ शकत नाही. कायदा फक्त दुर्बलांसाठीच असतो का?
भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही
इम्रान खान यांनी पाच महिन्यांपूर्वीही भारताचे कौतुक केले होते. आपल्यासोबत भारत स्वतंत्र झाला, असे ते म्हणाले होते. मी जास्त चांगले ओळखतो. तिथे माझे बरेच मित्र आहेत. तेथे एक प्रामाणिक समाज आहे. भारताला चालवण्यासाठी कोणत्याही महाशक्तीची गरज नाही. त्यांच्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. रशियावर बंदी असतानाही ते तेल विकत घेत आहेत.
एका रॅलीत इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची जोरदार प्रशंसा केली. येथे त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये जयशंकर रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत.
हा व्हिडिओ दाखवत इम्रान म्हणाले की, हा एक स्वतंत्र देश आहे. पाकिस्तानसोबत भारताला स्वातंत्र्य मिळाले. जर नवी दिल्ली आपले परराष्ट्र धोरण आपल्या जनतेच्या गरजेनुसार बनवू शकते, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार का नाही?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणाले की, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल न घेण्यास सांगितले होते, मात्र भारताने अमेरिकेचा सामरिक मित्र असूनही रशियाकडून तेल विकत घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App