वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार वेगवेगळे पर्याय तयार करत आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सैन्य दलाच्या तीन प्रमुखांबरोबर बैठक झाली. त्या पाठोपाठ आज केंद्रीय गृह मंत्रालयात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक झाली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात करायच्या कठोर उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाने वर उल्लेख केलेले सर्व अंतर्गत सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहमंत्रालयातले वरिष्ठ सचिव उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या कालच्या बैठकीचे कुठलेही तपशील बाहेर आलेले नाहीत त्याचबरोबर आजच्या बैठकीतले कुठलेही तपशील समजलेले नाहीत.
एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने सोशल मीडियातून राजकीय गदारोळ चालविला असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना “गायब” केले असताना स्वतः ते आणि संरक्षण मंत्रालयातील आणि गृह मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी विविध महत्त्वपूर्ण आणि गोपनीय बैठका घेत आहेत. पाकिस्तान विरुद्ध कायमची कठोरची कारवाई करायचा मोदी सरकारचा इरादा असून त्या दिशेने ठाम पावले उचलली आहेत. मात्र या कुठल्याच बैठकांमधले कुठलेही तपशील अधिकृतपणे बाहेर आलेले नाही किंवा कुठलीही माहिती “लीक” झालेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App