Central government : केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; एक एप्रिलपासून हटणार 20 % कांदा निर्यात शुल्क

central government

प्रतिनिधी

नाशिक : Central government  केंद्र सरकारने अखेर १८ महिन्यानंतर कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले असून १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे. लाल कांदा संपुष्टात येत असताना उन्हाळ कांद्याच्या भावात होणारी घसरण थांबून स्थिरता येणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.Central government

देशात कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत लाल कांदा १२०० रुपये तर उन्हाळ कांदा १४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत कांदा उत्पादकांचे प्रति क्विंटल १००० रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पहायला मिळत होते. मध्यंतरी कांदा निर्यात खुली करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत लासलगाव बाजार समितीत ‘शोले’ स्टाइल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.



नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांदा १२०० रुपये तर उन्हाळ कांदा १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात कांदा उत्पादकांचे प्रतिक्विंटल १००० रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मध्यंतरी कांदा निर्यात खुली करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत लासलगाव बाजार समितीत शोले स्टाईल आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्याच दिवशी छगन भुजबळ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कांदा निर्यात खुली करण्याची मागणी केली होती.

Important decision of the central government; 20% onion export duty will be removed from April 1

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात