वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : Kerala High Court शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी त्याची चौकशी व्हावी, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन म्हणाले, दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे. न्यायालयाने केरळच्या पोलिस महासंचालकांना यासंबंधी एक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. ते एक महिन्यात लागू करण्याचेही आदेश दिले.Kerala High Court
कोर्ट म्हणाले, एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला हलकेच मारले, धक्का दिला. त्यात दुर्भावना नसल्यास ते गुन्ह्याचे प्रकरण ठरणार नाही. त्यास गुन्ह्याच्या श्रेणीत टाकू नये. अन्यथा शिक्षक आपली जबाबदारी नीटपणे पार पाडू शकणार नाहीत.
विद्यार्थी किंवा पालकाने शिक्षकाच्या विरुद्ध तक्रार दिल्यास आधी या प्रकरणाची नीटपणे चौकशी करावी. म्हणजेच गुन्हा दाखल करण्यासाठी ठोस आधार आहे किंवा नाही, हे तपासले गेले पाहिजे. शिक्षकांना छडी बाळगण्याची परवानगी असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहावी. तसे असले तरीही छडीचा नेहमी वापर योग्य नाही. शाळेत शिस्त राहावी म्हणून छडी पुरेशी आहे. एका प्रकरणात विद्यार्थ्याला वेताने मारल्याचा आरोप शिक्षकावर असून त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे निर्देश दिले. विद्यार्थ्याने अभ्यासाविषयी गंभीर व्हावे, असा उद्देश होता, असे सदर शिक्षकाने सुनावणीत सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App