सरकारने २०२२-२३ साठी जीडीपी विकास दराची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे आणि ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आर्थिक विकास दराचा अंदाज कमी होऊनही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असे आयएमएफने म्हटले आहे. IMF projects India to be fastest growing economy in the world
तथापि, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भारताचा आर्थिक विकास दर ६.१ टक्क्यांवरून ५.९ टक्के करण्यात आला आहे. जागतिक संस्थेने २०२४-२५ साठी भारताचा वाढीचा अंदाज आपल्या वार्षिक जागतिक आर्थिक आउटलुकमध्ये ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. याआधी जानेवारीमध्ये हा आकडा ६.८ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
चालू आर्थिक वर्षातील ५.९ टक्के वाढीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये विकास दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. IMF चा वाढीचा अंदाज RBI च्या अंदाजापेक्षा कमी आहे. RBI च्या मते, २०२२-२३ मध्ये विकास दर ७ टक्के आणि चालू आर्थिक वर्षात ६.४ टक्के असू शकतो. सरकारने २०२२-२३ साठी जीडीपी विकास दराची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
IMF projects India to be fastest growing economy in the world Read @ANI Story | https://t.co/jNUrMivixs#IMF #economy #IndianEconomy pic.twitter.com/hFrzqf7s6L — ANI Digital (@ani_digital) April 11, 2023
IMF projects India to be fastest growing economy in the world
Read @ANI Story | https://t.co/jNUrMivixs#IMF #economy #IndianEconomy pic.twitter.com/hFrzqf7s6L
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2023
IMF च्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या उपसंचालक अॅन-मेरी गुल्डे-वुल्फ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे आणि ती सर्वात वेगाने वाढणारी आशियाई अर्थव्यवस्था आहे, तसेच ती जगातीलही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App