विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशभरात वाढलेला जातीय हिंसाचार आणि द्वेषमूलक भाषणांबाबत चिंता व्यक्त करतानाच आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहितानाच याविरोधात उघडपणे बोलण्याची विनंती केली आहे. IIM students wrote letter to PM modi
अशा घटनांवर खुद्द पंतप्रधानच गप्प असल्याने द्वेषमूलक चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची हिंमत वाढत चालली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या देशाचे विभाजन करू पाहणाऱ्या शक्तींविरोधात तुम्ही कठोर भूमिका घ्यायला हवी, या लोकांपासून देशाचे ऐक्य आणि सर्वसमावेशकतेला मोठा धोका असल्याचा आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
हरिद्वार येथील धर्मसंसदेत करण्यात आलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. द्वेषमूलक भाषणे आणि जात- धर्मांचा आधार घेत एका विशिष्ट समुदायावर हल्ला करण्याची चिथावणी दिली जात असेल तर ते अस्वीकारार्ह आहे. भारतीय राज्यघटना देखील व्यक्तीला तिच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देते, असे असताना सध्या देशभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App