विशेष प्रतिनिधी
सुरत: Pandit Pradeep Mishra सूरतचे कथाकार प्रदीप मिश्रा यांनी लव्ह जिहादबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अर्धवट घरे आणि खऱ्या व्यक्तीला ओळखा. चुकीच्या व्यक्तीच्या बंगल्याला पाहून भुललात तर फ्रिजमध्ये तुकडे मिळतील, त्यासाठी देखील तयार रहावे, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला आहे.Pandit Pradeep Mishra
पंडित प्रदीप मिश्रा यांनी लव्ह जिहादच्या घटनांवर चिंता व्यक्त केली असून, युवतींना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, काही जण आपली खरी ओळख लपवून युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि शेवटी त्यांना फसवतात.
पंडित मिश्रा म्हणाले, “काही युवक आपली ओळख लपवून युवतींना आकर्षित करतात आणि नंतर लग्नाच्या नावाखाली फसवणूक करतात. जर चुकीच्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडलात, तर तुमच्या आयुष्याचा नाश होऊ शकतो. काही प्रकरणांत तर फ्रीजमध्ये तुकडे सापडण्यासारख्या भयंकर घटना घडू शकतात.”
त्यांनी उपस्थित शिवभक्तांना अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, सनातन धर्म जरी साधा असला, तरी त्याच्या सच्चेपणामुळे तुम्हाला योग्य मार्ग दाखवला जाईल. त्यामुळे अशा चुकीच्या व्यक्तींना ओळखून सावधगिरी बाळगा.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विधानावर काँग्रेस प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी टीका केली आहे. देश संविधानाने चालवला जातो आणि संविधानाचे पालन केले पाहिजे. ते एक धार्मिक नेते आहेत आणि त्यांनी धर्माचा प्रसार केला पाहिजे. संविधान महत्त्वाचे आहे आणि पोलीस नियमांनुसार कारवाई करतात. जो कोणी चूक करतो त्याच्यावर कायदा कारवाई करतो, असे ते म्हणाले.
भाजपने यावर भूमिका व्यक्त करताना म्हटले आहे की, प्रदीप मिश्रा हे एक धार्मिक नेते आहेत आणि ते समाजाला जागरूक करतात. समाजाला जागरूक करणे हे धार्मिक नेत्याचे काम आहे. ते त्यांचे काम करत आहेत. खरं तर अशी प्रकरणे समोर येतात आणि म्हणूनच जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App