विक्रमी वेळेत नवी संसद भवन निर्माण केल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे कौतुक केले पाहिजे, असंही आझाद यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या हस्ते २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र या सोहळ्याला काँग्रेस आणि समविचारी पक्ष विरोध करत आहेत. तर, त्यांच्या विरोधावर आता काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. If there is so much love for the President why field a candidate against him Ghulam Nabi Azad
गुलाम नबी आझाद म्हणाले, विरोधी पक्ष विरोध का करत आहेत, हे समजत नाही. त्यांना तर देशाला नवी संसद मिळत असल्याचा आनंद झाला पाहिजे. मी दिल्लीत असतो तर नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहिलो असता. विक्रमी वेळेत नवी संसद भवन निर्माण केल्याबद्दल विरोधकांनी सरकारचे कौतुक केले पाहिजे, मात्र ते तर सरकारवर टीका करत आहेत. उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना माझा ठाम विरोध आहे.
गुलाम नबी आझाद म्हणाले, नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संसदीय मंत्री असताना त्यांनी नवीन संसद बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते म्हणाले, मी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी नवीन संसद बनवण्याबाबत चर्चा केली होती, नकाशाही बनवला होता, पण तेव्हा आम्ही बनवू शकलो नाही.
#WATCH | I would surely attend the inauguration ceremony of the new Parliament building if I was in Delhi. The opposition should praise the government to build the new Parliament in record time, whereas they are criticising the govt. I am strictly against the opposition… pic.twitter.com/fo5bayAwcn — ANI (@ANI) May 27, 2023
#WATCH | I would surely attend the inauguration ceremony of the new Parliament building if I was in Delhi. The opposition should praise the government to build the new Parliament in record time, whereas they are criticising the govt. I am strictly against the opposition… pic.twitter.com/fo5bayAwcn
— ANI (@ANI) May 27, 2023
याशिवाय ते म्हणाले की, ‘’देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची लोकसंख्या पाचपट वाढली आहे, त्यानुसार लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली आहे. म्हणूनच संसदेची नवी इमारत बांधावी लागली. आझाद पुढे म्हणाले, मी नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या अनावश्यक वादाच्या विरोधात आहे. विरोधकांकडे मुद्यांची कमतरता नाही, ते चुकीचे मुद्दे मांडत आहेत आणि विरोधकांचे राष्ट्रपतींबद्दल इतके प्रेम असेल तर त्यांच्या विरोधात उमेदवार का उभा केला?’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App