Karnataka Election : “दलित उपमुख्यमंत्री न केल्यास…” कर्नाटक काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा हायकमांडला इशारा!


काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा  निर्णय घेतलेला आहे.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला इशारा दिला की, ‘’उपमुख्यमंत्रीपद दलिताला दिले नाही, तर त्याच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उमटतील आणि पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागेल.’’ एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जनता दल (एस) युती सरकारच्या काळात जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री होते आणि ते दलित समाजाचे आहेत. ते प्रदीर्घ काळसाठी (आठ वर्षे) प्रदेश काँग्रेसचे प्रमुखही राहिले आहेत. If the Dalit Deputy Chief Minister is not a senior leader of the Karnataka Congress warned the high command

परमेश्वर यांचा हा इशारा अशा वेळी आला जेव्हा काँग्रेसने काही तासांपूर्वी सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. शिवकुमार म्हणाले, “शिवकुमार जे काही बोलले ते त्यांच्या मते बरोबर असू शकते परंतु हायकमांडचा दृष्टिकोन वेगळा असावा. हायकमांडला निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला आशा आहे की तो होईल…”

उपमुख्यमंत्रिपद न दिल्याने दलित समाजावर अन्याय झाला आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, लोकांना विशेषत: दलितांना मोठ्या आशा आहेत. “या आकांक्षा समजून घेऊन आमच्या नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागेल. तसे झाले नाही, तर त्याची प्रतिक्रिया नक्कीच उमटेल. मला हे सांगायची गरज नाही. नंतर लक्षात येण्यापेक्षा त्यांनी आता सुधारणा केली तर बरी. अन्यथा पक्षाला अडचणीचे ठरू शकते. मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी गोष्टी समजून घ्याव्यात.’’

If the Dalit Deputy Chief Minister is not a senior leader of the Karnataka Congress warned the high command

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात