विरोधकांचे ऐक्य झाले तरी किमान 100 जागांवर मतभेद कायम राहतील; पी. चिदंबरम यांची कबुली

वृत्तसंस्था

मुंबई : देशात भाजप विरोधातल्या पक्षांची एकजूट झाली तर 450 जागी भाजप विरोधात एकास एक उमेदवार उभे करता येईल, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते. पी. चिदंबरम यांनी केला आहे. पण याचा अर्थ असा की विरोधकांचे ऐक्य झाले तरी किमान 100 जागांवर तरी त्यांच्यातले मतभेद कायम राहतील, अशी कबुलीच अप्रत्यक्षपणे चिदंबरम यांनी दिली आहे. If opposition unity comes into existence, then 450 will be common candidates against BJP, this means there is differences over 100 candidates

केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पत्रकार परिषदा घेतल्या. केंद्रीय मंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही शॅडो पत्रकार परिषदा घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याची शॅडो पत्रकार परिषद पी. चिदंबरम यांनी घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

पण त्याच वेळी विरोधी पक्षांच्या एकजुटी बद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चिदंबरम म्हणाले, की भाजप विरोधकांचे ऐक्य साधण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पाटण्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बैठक बोलावली आहे. तिथे विरोधी एकजूटीवर चर्चा होईल. पण सध्या तरी अशी परिस्थिती आहे, की भाजप विरोधातल्या सर्व पक्षांची एकजूट झाली तर लोकसभेच्या किमान 450 जागांवर भाजप विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार उभा करता येऊ शकेल आणि एकास एक लढत झाली तर विरोधकांना विजयाची संधी मिळेल.

पण याचाच अर्थ असा की विरोधकांच्या एकजुटी नंतरही किमान 100 जागा अशा असतील जिथे विरोधकांमध्ये मतभेद होऊन फाटाफूट होईल, याची कबुलीच चिदंबरम यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

If opposition unity comes into existence, then 450 will be common candidates against BJP, this means there is differences over 100 candidates

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात