विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फिरणे मुश्कील करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.If Malik doesn’t resign, we will make it difficult for Mahavikas Aghadi ministers to move around, Chandrakant Patil warned
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्या आरोपाखाली ईडीने त्याना अटक केली आहे. न्यायालयाने मलिकांना ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीत निर्णय झाला होता.
परंतु दाऊद इब्राहिमच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत केला. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात याच मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी संघर्ष करेल. गावोगावी, रस्तोरस्ती भाजपा निदर्शने करेल. दाऊदला संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू आणि हा संघर्ष यशापर्यंत नेऊ. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जनतेमध्ये संताप उसळल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ताबडतोब त्यांचाही राजीनामा घेण्यात आला.मात्र, नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय आघाडीच्या प्रमुखांनी घेतलेला नाही.
सुरुवातीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मलिकांचा राजीनामा घ्यायचे ठरवले होते. मात्र, वरुन दाऊदचा दबाव आल्याने महाविकास आघाडीने घेतलेल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. दाऊदच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारला हटवण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App