
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोनाची तिसरी भारतात येईल. पण आधी वर्तविल्याप्रमाणे ती लवकर न येता, उशीरा येईल. असा निरीक्षण आयसीएमआरच्या अभ्यासातून नोंदविण्यात आले आहे. ICMR has come up with a study which says 3rd wave is likely to come late. We’ve window period of 6-8 months to immunise everybody in country
या अभ्यासाबाबत कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोडा यांनी माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, भारताला ६ ते ८ महिन्यांचा वेळ आहे. ज्यामध्ये सर्व लोकांच्या लसीकरणावर फोकस असला पाहिजे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये दररोज एक कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, Zydus Cadila लसीचे ट्रायल जवळपास पूर्ण झाले आहे. जुलैच्या अखेरपर्यंत १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांना आपण लसीचे डोस देऊ शकतो.
शाळा नक्की सुरू होणार तरी कधी? या प्रश्नाचे उत्तर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की लहान मुलांचे लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याच्या शक्यता आहे.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे दुसऱ्या तसेच तिसऱ्या चाचणीचे परिक्षण सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. ड्रग कंन्ट्रोलर च्या मंजूरी नंतर लहान मुलांसाठी लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतील, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
Trial for Zydus Cadila vaccine is almost complete. By July end or in August, we might be able to start administering this vaccine to children of 12-18 age group: Dr NK Arora, Chairman, COVID working group
— ANI (@ANI) June 27, 2021