वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीमेवरील तणावाच्या पृष्ठभूमीवर भारतीय वायुदलाला दोन मिराज-2000 लढाऊ विमाने फ्रान्सकडून विकत घेतली असून, ती ग्वाल्हेर येथील वायुदलतळावर दाखल झाली आहेत. IAF gets two Mirage 2000 fighters from France to strengthen combat aircraft fleet
प्रशिक्षण श्रेणीतील दोन मिराज विमाने भारताने घेतली आहेत. फ्रान्स वायुदलाच्या संरक्षणात उड्डाण घेतलेली ही विमाने ग्वाल्हेर येथील वायुतळावर दाखल झाली. वायुदल मिराजच्या ताफ्यातील विमानांची संख्या 50 करण्याच्या प्रयत्नात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही दोन विमाने विकत घेण्यात आली आहेत.
वायुदलाने वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये 51 मिराज विमाने घेतली असून, या माध्यमातून तीन स्क्वाड्रन तयार करण्यात आल्या आहेत. ही सर्व विमाने ग्वाल्हेर वायुतळावर तैनात करण्यात आली आहेत. देशातील 51 मिराज विमानांचे आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारताने फ्रान्ससोबत करार केला आहे.
अपघातांमुळे काही मिराज विमाने नष्ट झाल्याने आधुनिकीकरणासाठी मागवण्यात आलेली काही उपकरणे शिल्लक आहेत, अशी माहिती सूत्राने दिली. हीच उपकरणे खरेदी करण्यात आलेल्या दोन मिराज विमानांसाठी वापरली जाणार असून, कारवायांसाठी ती सज्ज केली जाणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App