ममता बॅनर्जींना जर माजी मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी राजकारण सोडेन – सुवेंदु अधिकारींचा निर्धार!

nandigram election result calcutta high court issues notice to suvendu adhikari on mamata banerjee plea

तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रहावा यासाठी ममतांनी अमित शाह यांना फोन केला होता, असा दावाही सुवेंदु अधिकारींनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे परंतु विद्यामान विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी आता त्यांना माजी मुख्यमंत्री बनविण्यावर ठाम आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी सांगितले की, लोकशाही मार्गाने ममता बॅनर्जींना पराभूत करण्यात अयशस्वी झाल्यास मी राजकारण सोडेन. I will quit politics if I do not make Mamata Banerjee EX CM  Suvendu Adhikari

न्यायालयात जाण्याचे दिले आव्हान –

सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) त्यांच्या विधानावर न्यायालयात जाण्याचे आव्हान दिले आहे, ज्यात त्यांनी दावा केला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना TMC चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी फोन केला होता.

ममतांचा लोकशाही मार्गाने पराभव करू –

सुवेंदु अधिकारी एका भाषणात म्हणाले, ‘ममता बॅनर्जींना लोकशाही मार्गाने पराभूत करून त्यांना माजी मुख्यमंत्री करण्यात मी अपयशी ठरलो तर मी राजकारण सोडेन.’ तर तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यासाठी त्यांनी अमित शहा यांना फोन केल्याचे सिद्ध  झाल्यास राजीनामा देईन असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.  याशिवाय टीएमसीने बुधवारी एका पत्राद्वारे सुवेंदु अधिकारी यांना तुमचे “खोटे आणि बदनामीकारक दावे” मागे घ्या असे सांगितले आणि कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला.

ममता बॅनर्जींचे हे नेहमीचे झाले आहे. मोदी सरकार पुढे आत मध्ये सरेंडर आणि बाहेर हल्लाबोल. ममता बॅनर्जी जेव्हा अडचणीत सापडतात तेव्हा त्या केंद्र सरकार पुढे शरणागती पत्करतात आणि बाहेर येऊन हल्लाबोल करतात. अशी टीकाही सुवेंदु अधिकारींनी केली होती.

I will quit politics if I do not make Mamata Banerjee EX CM  Suvendu Adhikari

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात