राजकारण हेच आपलं जनसेवेचं माध्यम असल्याचं सांगत, जर सिनेमा त्यांच्या राजकीय करिअरच्या आड येत असेल तर राजकारण सोडण्यासाठी तयार असल्याचं कमल हसन यांनी म्हटलंय.
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मक्कल नीधि मय्यम अर्थात MNM या राजकीय पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी मोठं वक्तव्य केलं. राजकारण हेच आपलं जनसेवेचं माध्यम असल्याचं सांगत, जर सिनेमा त्यांच्या राजकीय करिअरच्या आड येत असेल तर सिनेमा सोडण्यासाठी तयार असल्याचं कमल हसन यांनी म्हटलंय. सध्या तामिळनाडू विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. I will leave Cinema for Politics, says actor Kamal Hassan
सिनेमा हा जर माझ्या राजकीय करिअरसाठी बाधा बनत असेल तर मी माझ्या हाती असलेले सिनेमे संपवून ते क्षेत्र सोडून देईन, असं कमल हसन यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राजकारणात आपलं येणं ऐतिहासिक आहे. कारण आपण त्या 30 टक्के लोकांमधील आहोत जे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी आमदार असताना आपल्या आदर्शांचा प्रचार करण्यासाठी आणि जनसेवेसाठी आपलं लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं, असंही कमल हसन म्हणाले.
‘माझे विरोधी उमेदवार म्हणतात की मी राजकारणातून गायब होईल आणि पुन्हा सिनेमामध्ये जाईल. पण मी पाहतो की कोण गायब होईल, ते तर जनता ठरवेल’, अशा शब्दात कमल हसन यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कमल हसन यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
दरम्यान, कमल हसन यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल हसन हे कोईम्बतूर साऊत वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार पलनीकुमार यांच्या तक्रारीनंतर कमल हसन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कमल हसन यांनी देवाचं चित्र असलेले कपडे घालून रामनगरच्या रामाना मदिंरासमोर प्रचार केल्याचा आरोप पलनीकुमार यांनी केलाय. हा प्रकार आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत त्यांनी कमल हसनविरोधात तक्रार दाखल केली. पलनीकुमार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमाखाली कमल हसन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App