सेक्स करायला जायचेय, ई-पाससाठी या पठ्याने दिले कारण

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अगदीच महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अडचण नको म्हणून देशभरात ई-पास दिला जातो. यासाठी योग्य कारण असल्यास ई-पास मिळतो. मात्र, केरळमधील एका तरुणाने ई-पास मागाताना असे कारण लिहिले की पोलीसही चक्रावून गेले. सेक्स करण्यासाठी जायचेय असे कारण या पठ्याने लिहिले होते.I want to have sex, He gave this reason for e-pass


विशेष प्रतिनिधी

कन्नूर : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अगदीच महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अडचण नको म्हणून देशभरात ई-पास दिला जातो. यासाठी योग्य कारण असल्यास ई-पास मिळतो.

मात्र, केरळमधील एका तरुणाने ई-पास मागाताना असे कारण लिहिले की पोलीसही चक्रावून गेले. सेक्स करण्यासाठी जायचेय असे कारण या पठ्याने लिहिले होते.
केरळमधील कन्नूर कन्नपुरम जिल्ह्यातील इरिनावे या गावात हा तरुण राहतो.



त्याने ई पाससाठी भरलेल्या फॉर्ममध्ये सेक्स करायला बाहेर जायचे आहे असे नमूद केले होते. त्याची ही विनंती पाहून पोलीस देखील चक्रावले. त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्तांना सांगितले. त्यानंतर उपायुक्तांनी त्या तरुणाला ताब्यात घेण्याचे आदेश वालापट्टनम पोलिसांना दिले.

काही वेळातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्यानंतर मात्र त्याची तंतरली. त्यानंतर त्याने टायपिंग मिस्टेकमुळे असे घडल्याचे सांगितले. त्याला सहा वाजता असे लिहायचे होते मात्र ते चुकून सेक्स लिहले गेले.

त्यानंतर त्या तरुणाने पोलिसांची माफी मागितली. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले.बुधवारी बिहार मधील पुर्णिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी ट्वीट करून पिंपल्सवरील उपचारासाठी एका तरुणाने ईपासची मागणी केल्याचे सांगतिले होते.

आपल्या ट्वीटमध्ये राहुल कुमार यांनी एक अर्ज जोडला होता, ज्यामध्ये ई-पास देण्याची मागणी करण्यात आली होती. आजाराचे कारण देताना चेहºयावरच्या पिंपल्सवर इलाज असे देण्यात आले आहे. यावर राहुल कुमार यांनी लिहिले आहे की, भाई तुझे पिंपल्स उपचारासाठी थोडी आणखी वाट पाहू शकतील.

I want to have sex, He gave this reason for e-pass

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात