I.N.D.I.A आघाडीचा देशभरात काँग्रेसला “तब्बल” 12 जागांचा फायदा; NDA आघाडीत भाजपचे 13 जागांचे नुकसान!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळे सर्वेक्षणे बाहेर येत आहेत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स मी केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला तब्बल 12 जागांचा फायदा तर भाजपला दहा जागांचे नुकसान दाखविले आहे. आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर काँग्रेसला 66 जागांवर विजय मिळेल, तर भाजपला 290 जागांवर विजय मिळेल, असे या सर्वेक्षणात दाखविले आहे. याचा अर्थ 2019 च्या तुलनेत भाजपला 13 जागांचे नुकसान तर काँग्रेसला 12 जागांचा फायदा होईल, असे दिसते. कारण 2019 मध्ये काँग्रेसला लोकसभेच्या 54 जागा तर भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या.I.N.D.I.A alliance wins Congress “double” 12 seats nationwide; BJP loses 13 seats in NDA alliance!!

संपूर्ण बहुमत मात्र मोदी सरकारला मिळणार असून I.N.D.I.A आघाडीला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाला 20 जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपानंतर सर्वाधिक 11 जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळू शकतील. काँग्रेसला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.



मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला 32 % , उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16 %, काँग्रेस 16 %, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 16 %, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 %, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 % आणि अन्य पक्षांना 11 % मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जागांच्या हिशेबात भाजपाच्या 3 जागा कमी होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेला फक्त 2 जागा मिळणार असून 10 जागांचा फटका बसणार आहे. अजित पवारांना 2 जागांचा फायदा, तर काँग्रेसच्या 8 जागा वाढणार आहेत. उद्धव ठाकरेंना 6 जागा जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या मात्र 4 जागा तशाच राहणार आहेत.

विभागानिहाय कोणाला किती जागा मिळणार?

उत्तर महाराष्ट्र 6 जागा

  • एनडीए 3
  • इंडिया 3

विदर्भ 10 जागा

  • एनडीए 5
  • इंडिया 5

मराठवाडा 2 जागा

  • एनडीए 2
  • इंडिया 6

मुंबई 6 जागा

  • एनडीए 4
  • इंडिया 2

ठाणे आणि कोकण 7 जागा

  • एनडीए 5
  • इंडिया 2

पश्चिम महाराष्ट्र 11 जागा

  • एनडीए 5
  • इंडिया 6

I.N.D.I.A alliance wins Congress “double” 12 seats nationwide; BJP loses 13 seats in NDA alliance!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात