वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठी घडामोड घड़ली आहे. No Politics Please; असे म्हणत सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष बरखास्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत यांची तब्येत त्यांना राजकारण पुढे नेण्यासाठी साथ देत नव्हती. “I don’t have plans to enter politics in future,” says actor Rajinikanth, dissolves Rajini Makkal Mandram
तामिळनाडूनच्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणूकांमध्ये देखील रजनीकांत हे फारसे राजकीय ऍक्टीव राहू शकले नव्हते. इथून पुढे राजकारणात सहभागी व्हायचे की नाही, या विषयी रजनीकांत हे सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची बातमी सकाळी आली होती. मात्र, त्यानंतर तासाभरातच त्यांनी आपला रजनी मक्कल मंद्रम पक्ष बरखास्त करून टाकल्याची बातमी आली आहे.
रजनी मक्कल मंद्रम पक्ष बरखास्त करून त्याचे रूपांतर रजनी रासीगर नरपानी मंद्रम म्हणजे Rajinikanth Fans Welfare Forum मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. मी राजकारणात येणार नाही. माझ्या अनुयायांच्या संपर्कात राहीन. त्यांच्याशी चर्चा करीत राहीन, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
रजनीकांत हे तामिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकणारे व्यक्तिमत्व राहिले आहे. परंतु, त्यांनी प्रत्यक्षात राजकारणात कधीच उडी घेतली नाही. १९९६ च्या निवडणूकीत त्यांनी एकच वाक्य उच्चारले होते, जयललिता पुन्हा निवडून आल्या तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही. या वाक्याचा तामिळ जनतेवर एवढा पगडा बसला, की त्या निवडणूकीत जयललितांचा पराभव झाला. असे मानण्यात येते.
त्यानंतर रजनीकांत राजकारणात येणार अशा चर्चा बऱ्याच निवडणूकांमध्ये रंगल्या. पण त्यांनी प्रत्यक्षात कधी राजकारणात प्रवेश केला नाही आणि निवडणूकही लढविली नाही. आता तर त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंद्रम बरखास्त करून टाकल्याची बातमी आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App