बंगालमध्ये मोदी – शहांना “बाहेरचे” म्हणणाऱ्या ममतांचे गोव्यात येताच बदलले बोल!!

वृत्तसंस्था

पणजी : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ते “बाहेरचे” असण्याची टीका करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बोल गोव्यात येताच बदलले आहेत. मी बंगाली आहे. भारतीय आहे आणि त्यामुळे गोव्याची देखील आहे, असे उद्गार ममता बॅनर्जी यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात काढले आहेत. I believe in secularism. I believe in unity. I believe India is our motherland. If Bengal is my motherland, then Goa is also my motherland: West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee addresses party leaders in Panaji, Goa

गोव्याच्या मोहिमेची सुरुवात देखील ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तोंडी तोफा डगताना काँग्रेस पक्ष फोडूनच केली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माझी मिस फेमिना इंडिया नफिसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहे. त्यानंतर केलेल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी भारतीयत्वाची व्याख्या मांडली. बंगाल कसा मजबुतीने उभा राहिला आहे तसाच गोवा देखील मजबुतीने उभा राहिला पाहिजे. मी बंगाली आहे. भारतीय आहे आणि म्हणूनच गोव्याची देखील आहे.

तुमची बहीण म्हणून मी येथे आले आहे. तुम्हाला मदत करण्याचा माझा हेतू आहे, असे उद्गार ममता बॅनर्जी यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना काढले. मी धर्मनिरपेक्षता मानते. भारतीयत्व मानते. गोव्याच्या भूमीत धर्मनिरपेक्षता फार पूर्वीपासून रुजलेली आहे. पण तिला गेल्या दहा वर्षात धक्का लागला आहे. आपल्याला हे चित्र बदलायचे असेल तर निवडणुकीला एकजुटीने सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला देखील ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

या त्याच ममता बॅनर्जी आहेत ज्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना “बाहेरचे_ असे संबोधून हिणवले होते. बंगालमध्ये या “बाहेरच्या” लोकांचे काही काम नाही. बंगालची जनताच निर्णय घेईल, असे ममता बॅनर्जी वारंवार प्रचारक सांगत होत्या. आता मात्र गोव्यात आल्यावर त्यांना स्वतःच्या भारतीयत्वाचा साक्षात्कार झालेला दिसतो आहे. त्यामुळे त्यांनी आपण बंगाली भारतीय आणि त्यामुळेच गोव्याच्या सुद्धा आहोत, असे उदगार काढले आहेत.

I believe in secularism. I believe in unity. I believe India is our motherland. If Bengal is my motherland, then Goa is also my motherland: West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee addresses party leaders in Panaji, Goa

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात