वृत्तसंस्था
हैदराबाद : तब्बल 903 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यात दिल्लीसह हैदराबाद आणि अनेक ठिकाणी छापे घालून सायबर क्राईम पोलिसांनी एका चिनी नागरिकासह 10 जणांना अटक केल्याची माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी दिली आहे. Hyderabad cyber crime police arrested 10 people, including two Chinese nationals
देशातल्या अनेक राज्यांमधल्या नागरिकांना गुंतवणुकीची आकर्षणे दाखवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती विविध मार्गांनी गोळा करून त्यांची बँक खाते पूर्ण खाली करण्याचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 903 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीसह हैदराबाद व अन्य काही ठिकाणी कॉल सेंटरवर सायबर क्राईम पोलिसांनी एकाच वेळी छापे घालून या घोटाळ्याशी संबंधित 11 जणांना अटक केली आहे. यामध्ये एका चिनी नागरिकाचा समावेश आहे. हे सगळेजण मोबाईलची विविध एप्लीकेशन्स वापरून हजारो नागरिकांच्या बँक अकाउंटची माहिती गुप्तपणे काढत होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांची नावे सांगून त्यांना विविध क्षेत्रातल्या गुंतवणुकीची आकर्षणे दाखवत होते आणि हळुहळू संबंधित नागरिकांची बँक अकाउंट बेमालून पणे खाली करत होते.
गुंतवणूक घोटाळ्यातील आरोपींनी गुंतवणुकीसाठी नागरिकांना सांगितलेल्या सर्व कंपन्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील एका कॉल सेंटर वरील छाप्यांमधून सुरुवातीला यातील काही धक्कादायक माहिती उघड झाली. त्यानंतर दिल्लीसह विविध राज्यांची सायबर क्राईम पोलीस ऍक्टिव्हेट झाले. त्यांनी एकाच वेळी दिल्ली, हैदराबाद आणि अन्य काही ठिकाणी छापे घातले आणि त्यातूनच जी माहिती बाहेर आली आहे, त्यामध्ये हा गुंतवणूक घोटाळा तब्बल 903 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे गुंतवणूक घोटाळा नेटवर्क आणखी मोठे असून देशात ठिकठिकाणी कमिशन एजंट नेमून गुंतवणुकीचे प्रकार देखील घडल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. विविध राज्यांचे सायबर क्राईम पोलिस आता या कमिशन एजंटची पाळेमुळे खोदण्याच्या मागे लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App