वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असून ते चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असनी, असे चक्रीवादळाचे नाव ठेवले आहे. हे २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल.Hurricane Hurricane in the Bay of Bengal; Andaman will hit Nicobar in four days
बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी भागात या वादळाचा परिणाम जास्त दिसून येणार आहे. समुद्र किनारपट्टी वगळून अन्य भागात त्याचा जास्त परिणाम दिसणार नाही. परंतु, त्यामुळे उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूने आणि त्याच्या बाहेर जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App