विशेष प्रतिनिधी
लडाख : लडाखमधील शंभर टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डेस मिळाला आहे. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात लडाखने देशात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केल्याने हे शक्य झाले आहे.Hundred percent of the population in Ladakh received the first dose of the corona vaccine
अधिकृत माहितीनुसार, लडाखमधील ८९,४०४ लोक हे लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचाही समावेश आहे. त्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळाला आहें. त्यातील ६०,९३६ लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.
केवळ तीन महिन्यांत हे शक्य झाले आहे. लडाखमध्ये वास्तव्यास असलेल्या ६,८२१ नेपाळी नागरिकांचेही लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर हॉटेल कर्मचारी, स्थलांतरीत मजूर आणि नेपाळी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्रालय आणि सर्व कोविड वॉरियर्स यांच्या प्रयत्नांमुळे लडाख सर्व लोकांना लसीकरण करणारा देशातील पहिला केंद्र शासित प्रदेश बनला आहे, असे लडाखचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल म्हणाले .
केंद्र सरकारनेही लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि अडचणी असूनही लसीकरणाचा वेग वाढविला. आम्ही अतिरिक्त लस तयार केल्या. सरकारने त्यांचा वाया घालवण्याऐवजी या वयोगटातील लसीकरण करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतल्यानंतर आम्ही लसीकरण सुरू केले ,असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App