मोदी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये मानवी हक्क स्थितीत सुधारणा!!; जेएनयुची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदला उपराती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. लाखो काश्मिरी तरुण-तरुणींनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला. इतकेच काय पण दहशतवाद्यांच्या नातेवाईकांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहात सहभाग घेतला.However inconvenient it may be to admit this, the human rights record in Kashmir has improved under the narendra modi government

स्वातंत्र्य दिनाचे हे उत्साही वातावरण पाहून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद हिला उपरती झाली आहे आणि तिने जम्मू काश्मीर मधल्या परिस्थितीत मोदी सरकारच्या काळात खूप सुधारणा झाल्याची कबुली दिली आहे.हीच ती शेहला रशीद आहे, जी तुकडे तुकडे यांची सदस्य आहे. उमर खालिद आणि कन्हैया कुमार यांच्याबरोबर ती भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देण्यात आघाडीवर होती. तिच्याविरुद्ध सध्या केस सुरू आहेच. पण आता मात्र जम्मू-काश्मीर मधली परिस्थिती पाहून तिला उपरती झाली असून तिने मोदी सरकारला परिस्थिती सुधारण्याचे श्रेय दिले आहे.

या संदर्भात तिने ट्विट केले आहे. अनेकांना हे गैरसोयीचे वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे की जम्मू-काश्मीर मधले मानवी हक्का संदर्भातले काश्मीर मधले रेकॉर्ड मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आणि तिथल्या प्रशासनाच्या निगराणीत सुधारले आहे. त्यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकले आहेत. हे माझे निरीक्षण आहे, असे मत तिने ट्विटमध्ये नोंदविले आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने सोपोर मधील आपल्या दुकानावर तिरंगा फडकवला. काश्मीरमध्ये विकास होतो आहे. इथे शांतता नांदते आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी पर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दुकान बंद ठेवायला लागायचे. पण आता ती परिस्थिती उरलेली नाही. त्यामुळे आपण खुश आहोत, असे रईस मट्टूने जाहीरपणे सांगितले होते.

या संदर्भातला त्याचा व्हिडिओ शेहला रशीदने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यातूनच तिला मोदी सरकारच्या काळात जम्मू-काश्मीर मधल्या परिषदेत सुधारणा झाल्याची कबुली देण्याची उपरती झाली आहे.

However inconvenient it may be to admit this, the human rights record in Kashmir has improved under the narendra modi government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात