विजय रुपाणी ५ जून रोजी त्यांच्या पत्नीसह लंडनला जाणार होते, परंतु…
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद -Vijay Rupani गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठी १२०६ हा नंबर खूप लकी मानला जात होता. त्यांच्या स्कूटर आणि कारच्या नंबर प्लेटवर १२०६ हा नंबर होता. तो त्यांच्यासाठी चांगल्या उर्जेचा स्रोत होता, परंतु १२ जून २०२५ रोजी, हा नंबर एक क्रूर योगायोग बनला. जेव्हा ते या दिवशी म्हणजे काल अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-१७१ मध्ये होते आणि त्यांचे विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांतच कोसळले.Vijay Rupani
या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विजय रुपाणी व्यतिरिक्त या अपघातात २४० इतर लोकांचाही मृत्यू झाला आहे. तथापि, या अपघातात एक व्यक्ती चमत्कारिकरित्या वाचली आहे. विमानात १० क्रू मेंबर्स, दोन पायलट आणि २३० प्रवासी होते. हा अपघात मेघनी येथील रहिवासी भागात झाला, ज्यामुळे या अपघातात अन्य २४ स्थानिक लोकांचाही मृत्यू झाला.
पंजाब भाजपचे प्रमुख सुनील जाखड यांच्या मते, विजय रुपाणी ५ जून रोजी त्यांच्या पत्नीसह लंडनला जाणार होते, परंतु लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी हा दौरा १२ जूनपर्यंत पुढे ढकलला. आता जाखड यांनी दुःख व्यक्त केले आणि म्हटले ‘हे खूप दुर्दैवी आहे. नशिबाने असा खेळ केला की ते फेऱ्यात अडकले. रूपाणी त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते, पण ते पोहोचलेच नाहीत.’
१२०६ या क्रमांकाचा खेळ काय आहे?
रुपाणी त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलीला भेटणार होते. त्यांच्या मृत्यूच्या तारखेशी म्हणजेच १२ जून किंवा १२-१६ जूनशी संबंधित एक योगायोगही समोर आला आहे. खरं तर, गुजरातचे माजी मुख्यमंत्री १२०६ हा त्यांचा लकी नंबर मानत होते.
विजय रुपाणी यांच्या पहिल्या कार आणि त्यांच्या जुन्या स्कूटरवरही १२०६ हा क्रमांक होता. विजय रुपाणी हा क्रमांक त्यांच्यासाठी खूप शुभ मानत होते. आजही १२०६ क्रमांकाची कार आणि स्कूटर त्यांच्या घराबाहेर पार्क केलेली आहे. मात्र दुर्दैवी योगायोगाने, गुरुवारी १२-०६ ही तारीख त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App