भारताला जोडणाऱ्या दोन यात्रांमधून 12000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यावर 99 खासदार…; तर बिहारमध्ये 1300 किलोमीटर फिरल्यावर किती आमदार…??

Rahul Gandhi

नाशिक : भारताला जोडणाऱ्या दोन यात्रा मधून 12000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यावर 99 खासदार निवडून आले, तर बिहारमध्ये 1300 किलोमीटर फिरल्यावर आमदार निवडून येतील??, असा सवाल राहुल गांधींच्या नियोजित मतदार अधिकार यात्रेतून समोर आला आहे. Rahul Gandhi

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी साधारण 6 महिने भारतात जोडणाऱ्या दोन यात्रांमध्ये फिरले. या दोन्ही यात्रा मिळून साधारणपणे 12000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर त्यांनी कापले. लोकसभेतले 400 च्या आसपास मतदारसंघ त्यांनी कव्हर केले. या यात्रेत लाखो लोक आणि विरोधी पक्षांचे सर्व नेते थोडे थोडे किलोमीटर अंतर चालले. पण संपूर्ण यात्राभर एकटे राहुल गांधीच चालले. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा अशी या यात्रांची नावे होती. भारत जोडो यात्रा 136 दिवसांची होती, तर भारत जोडो न्याय यात्रा 162 दिवसांची होती. एवढे दिवस राहुल गांधी भारतातल्या रस्त्यावर फिरले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या खासदारांमध्ये 45 आकड्याने वाढ झाली. 2019 मध्ये काँग्रेसचे 54 खासदार निवडून आले होते. 2024 च्या निवडणुकीत 99 खासदार निवडून आले.

आता राहुल गांधी बिहारमध्ये साधारण 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1300 किलोमीटरची मतदार अधिकार यात्रा काढणार आहेत‌. त्यासाठी ते 16 दिवस बिहारमध्ये असतील. या यात्रेचा मार्ग त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करून त्याचे तपशील देखील जाहीर केले. त्यानुसार 17 ऑगस्टला सासाराम पासून सुरू होणारी ही यात्रा 1 सप्टेंबरला पाटण्यात गांधी मैदानात विसर्जित होईल. या यात्रेतून ते मतदारांचा हक्क याविषयी जनजागृती करणार आहेत. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जाऊन तो मुद्दा मांडण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.

राहुल गांधी संपूर्ण देशभर 12000 किलोमीटर पेक्षा जास्त फिरल्यानंतर काँग्रेसला 45 खासदार वाढवून मिळाले, पण त्यांची सत्ता देशात येऊ शकली नाही. आता राहुल गांधी ज्यावेळी 1300 किलोमीटर फिरतील, त्यावेळी बिहारमध्ये त्यांचे किती आमदार निवडून येऊ शकतील??, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येऊ शकेल.

How many MLAs Congress will be able to get after Rahul Gandhi’s Yatra??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात