विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना गुन्हेगार मानण्यात येऊ नये. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी कराव्यात. त्यांना सुधारगृहात पाठवण्यासंदर्भात एनडीपीएस कायद्यांमध्ये काही बदल करावेत वगैरे सूचना सध्या करण्यात येत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले देखील अशा सूचना करणाऱ्यांमध्ये सामील आहेत. How did the sudden mild role about drugs come out ?; What exactly is the secret?
त्याच वेळी काँग्रेस सारख्या पक्षामधून देखील ड्रग्ज विषयक अचानक अनुकूल भूमिका देखील घेण्यात येत आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्ज घेण्याचे वेगळ्या प्रकारे समर्थन केले आहे. ड्रग्ज तुमच्या वेदना कमी करू शकते. काही औषधे तुम्हाला ड्रग्ज मार्फतच घ्यावी लागतात,अशा शब्दात तुलसी यांनी सौम्य भूमिका घेतली आहे.
हे अचानक कसे घडले? बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणच सापडल्यानंतर त्याला वाचविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या भूमिका मांडल्या जात आहेत का? आर्यन खान सारखा बॉलिवूड सेलिब्रिटीचा मुलगा जर सापडला नसता तर थेट कायद्यामध्ये बदल करावेत ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना गुन्हेगार मानण्यात येऊ नये वगैरे सूचना समोर आणण्यात आल्या असत्या का? हे प्रश्न कळीचे आहेत.
समाजातील व्यसनाधिनता हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. परंतु एनङीपीसी कायद्यामध्ये सौम्यता आणून ही व्यसनाधीनता कमी होण्याची शक्यता आहे का? मूळात व्यसनाधीनता कमी करण्यासाठी कायदा सौम्य करणे हे कोणते अजब तर्कट आहे? केटीएस तुलसी तर त्या पुढे जाऊन असे म्हणतात, की ड्रग्ज काही प्रमाणात जीवनावश्यक आहेत. तंबाखू आणि दारू यांना जसा कर भरून सेवन करण्याची परवानगी दिली जाते तसेच परवानगी ड्रग्ज सेवनासाठी द्यावी, असे अजब तर्कट यांनी लढवले आहे. हा नेमका प्रकार काय आहे? समाजातली व्यसनाधीनता कमी करण्याचा करण्याचीही सूचना आहे की बड्या व्यसनाधीन लोकांना कायद्याच्या कचाट्यातून कायमचे वाचवण्यासाठी ही सूचना करण्यात येत आहे?, याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे…!!
सर्वसामान्य व्यसनाधीनतेचा अडकल्यानंतर त्यांना हा सौम्य कायदा लागू होईल का? शिवाय ड्रग्ज जर मूळातच वाईट पदार्थ असतील तर ती अल्पप्रमाणात बाळगण्याची परवानगी देणे किंवा त्याला गुन्हा न मानणे यातून नेमके काय साध्य करायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे कायदा सौम्य करणाऱ्याची सूचना करणारे देणार आहेत का?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App