केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी मंगळवारी सकाळी पंतप्रधान निवास 7 लोक कल्याण मार्गावर पोहोचले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी तिथली त्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काश्मीर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर ही बैठक झाली आहे. तत्पूर्वी, काल गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर सुरक्षा यंत्रणांसोबत सहा तासांची बैठक घेतली. सर्व एजन्सींना लहानसहान इनपूटवरही त्वरित कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. Home Minister Amit Shah meets PM Modi, NIA to probe target killing of innocents in Kashmir
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी मंगळवारी सकाळी पंतप्रधान निवास 7 लोक कल्याण मार्गावर पोहोचले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी तिथली त्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काश्मीर आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर ही बैठक झाली आहे. तत्पूर्वी, काल गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर सुरक्षा यंत्रणांसोबत सहा तासांची बैठक घेतली. सर्व एजन्सींना लहानसहान इनपूटवरही त्वरित कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
काश्मीरमधील दहशतवादी टारगेट किलिंगच्या माध्यमातून अल्पसंख्याक हिंदू आणि शिखांची हत्या करत आहेत. या दहशतवाद्यांना काश्मीरमधील 90च्या दशकातील परिस्थिती पुन्हा निर्माण करायची आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानांना गाठून काश्मीरमधील परिस्थिती आणि उचललेल्या पावलांची माहिती दिली. असे मानले जाते की काश्मीरमधील सुरक्षा एजन्सी मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधातील तपास आणि ऑपरेशन तीव्र करणार आहेत. दहशतवादी संघटना नवीन नावाने आणि लहान गटांमध्ये टारगेट किलिंग करत आहेत, त्यामुळे खालच्या स्तरावरील सर्व एजन्सींना संशयितांना ओळखून त्यांना पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी अगदी छोट्या माहितीवरही सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले. पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि सर्व राज्यांचे महानिरीक्षक, केंद्रीय पोलीस दलांचे प्रमुख, गुप्तचर संस्था आणि पोलीस संघटनांचे प्रमुख निवडक क्षेत्र अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App