गृहमंत्री अमित शाह यांनी पुलवामा येथील 40 शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली, CRPF कॅम्पमध्ये घालवली रात्र

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आलेल्या गृहमंत्र्यांनी सोमवारी सीआरपीएफ कॅम्पमध्येच रात्र घालवली. काश्मीरमधील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी ते येथे आले आहेत. home minister amit shah along with lieutenant governor manoj sinha paid tribute to the martyrs spent the night in crpf camp in pulwama


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आलेल्या गृहमंत्र्यांनी सोमवारी सीआरपीएफ कॅम्पमध्येच रात्र घालवली. काश्मीरमधील तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी ते येथे आले आहेत.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरच्या बाहेरील जेवन येथे असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस शहीद दिनानिमित्त सांगितले की, अनेक मशिदींमधून अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी आवाहन केले जात आहे, जे एक कौतुकास्पद पाऊल आहे. राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना सामोरे जाताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल. ते म्हणाले की, आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 1600 जवानांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत बलिदान दिले आहे. संपूर्ण देश या बलिदानाचा ऋणी आहे.

अमित शहांनी शहिदांच्या घरीही दिली भेट

काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आधी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी परवेझ दार यांच्या घरी पोहोचून कुटुंबीयांची भेट घेतली. शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजू नका. दार आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सर्वोच्च बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल.’ त्यांनी दार यांच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनही दिले. काश्मीरमधील 11 नागरिकांच्या हत्येनंतर त्यांची ही पहिलीच राज्यभेट आहे यामुळे त्यांच्या या भेटीला अत्यंत महत्त्व आहे.

home minister amit shah along with lieutenant governor manoj sinha paid tribute to the martyrs spent the night in crpf camp in pulwama

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात