विशेष प्रतिनिधी
पाटणा : Tejashwi Yadav बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश देत दावा केला की, “२५ नोव्हेंबरला बिहारच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाईल. हा दिवस बदल, विकास आणि जनतेच्या सत्तेचा दिवस ठरेल.”Tejashwi Yadav
तेजस्वी म्हणाले, “१४ नोव्हेंबर ही तारीख इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. आज बदलाची तुतारी वाजली आहे, जनतेचा विजय जाहीर झाला आहे. आता प्रत्येक बिहारीने मनापासून महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, “बिहार ही लोकशाहीची जननी आहे. या वेळी निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील निवडणुकीची तारीख निश्चित केली आहे. १९९० ते २००५ दरम्यान बूथ लुटी आणि मतदारांना धमकावण्याच्या घटना घडल्या होत्या, पण आता ते बिहारमध्ये शक्य नाही. पारदर्शक आणि शांततेत मतदान होईल.”
राजकारणाच्या या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानेही निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून ११ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
आप नेत्यांच्या मते, ते दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘केजरीवाल मॉडेल’सह मैदानात उतरणार आहेत. पक्षाने बेरोजगारी, स्थलांतर, आणि महागाई या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App