वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातल्यानंतर भारतासह जगाच्या नजरा संजीवनी ठरणाऱ्या कोरोना लसीकडे लागल्या होत्या. अथक परिश्रमानंतर लस शोधण्यात यश आलं आणि लसीकरणाचा श्रीगणेशा झाला… बघता बघता आज देशाने लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला. भारताने १०० कोटी डोस देण्याचा उच्चांकाची आज नोंद केली. HISTORY CREATED: This time over 100 crores! The height of vaccination! India made history with top 100 crore doses in vaccination
India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark pic.twitter.com/g7DYqcvgjK — ANI (@ANI) October 21, 2021
India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark pic.twitter.com/g7DYqcvgjK
— ANI (@ANI) October 21, 2021
एक नवा इतिहास रचून भारताने जगभरात आज डंका वाजवली आहे. या खास दिवशी लाल किल्ला संकुलात आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १०० कोटी डोस देण्यात आले आहेत.
PM @narendramodi visits RML hospital in Delhi as India crosses historic landmark of administering 100 crore #COVID19 Vaccines doses.#VaccineCentury pic.twitter.com/iBZHJuQ1EB — All India Radio News (@airnewsalerts) October 21, 2021
PM @narendramodi visits RML hospital in Delhi as India crosses historic landmark of administering 100 crore #COVID19 Vaccines doses.#VaccineCentury pic.twitter.com/iBZHJuQ1EB
— All India Radio News (@airnewsalerts) October 21, 2021
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबद्दल भीती कमी होऊन नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला. देशात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला डोस दिला गेला. अपुरं उत्पादनामुळे देशातील लसीकरणाची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र, नंतर लसीकरणाने गती घेतली.
सुरुवातीच्या टप्प्यात देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १ मार्चपासून देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे ७५% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरात १०० स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. लाल किल्ल्यावर २२५ फूट लांब तिरंगा फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे १४०० किलो आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आणि मोठा आहे. यापूर्वी चीन हा एकमेव देश आहे, ज्याने १०० कोटींपेक्षा जास्त लस डोस दिले आहेत. आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी यापूर्वी सांगितले होते की १०० कोटी डोस दिल्यानंतर, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना लवकरच दुसरा डोस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील ७५ टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या ३१ टक्के लोकांनी दुसरा डोस देखील घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App