विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 17 सप्टेंबर हा दिवस इथून पुढे हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने जाहीर केला आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहताना हा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात ट्विट करून पंतप्रधान मोदींच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. historic day as PM Modi has decided to celebrate the 17th of September every year as Hyderabad Liberation Day
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थानावर इस्लामी रझाकारी राजवटीची पकड मजबूत ठेवण्यासाठी तिथला शासक निजामाने प्रयत्न केले, इतकेच नाहीतर भारतातल्या इतर मुस्लिम संस्थानिकांची संपर्क साधून भारतातल्या भारतातली मुस्लिम संस्थाने आणि पाकिस्तान यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद मध्ये पोलीस ॲक्शन घेऊन हैदराबाद तीन दिवसांमध्ये निजामाच्या राजवटीतून मुक्त केले, तो दिवस 17 सप्टेंबरचा होता.
– हिंदू महासभेचा संग्राम
त्यापूर्वी देखील हैदराबाद संस्थान निजामाच्या इस्लामी राजवटीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी अनेक संग्राम झाले हिंदू महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वंदे मातरम रामचंद्र राव यांच्या नेतृत्वाखाली भागानगर मुक्ती लढा उभारला होता. निजामाकडून हिंदू समाजासाठी 50 % पेक्षा जास्त सवलती मिळवून तो लढा त्यांनी यशस्वी केला होता.
Union Home Minister Amit Shah tweets "It is a historic day as PM Modi has decided to celebrate the 17th of September every year as Hyderabad Liberation Day in honour of the martyrs of the Hyderabad Liberation Movement. The decision is a befitting tribute to the freedom fighters… pic.twitter.com/1jPMMImrWf — ANI (@ANI) March 13, 2024
Union Home Minister Amit Shah tweets "It is a historic day as PM Modi has decided to celebrate the 17th of September every year as Hyderabad Liberation Day in honour of the martyrs of the Hyderabad Liberation Movement. The decision is a befitting tribute to the freedom fighters… pic.twitter.com/1jPMMImrWf
— ANI (@ANI) March 13, 2024
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली देखील मोठा मुक्ती लढा झाला. त्यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि शंकरराव चव्हाण हे त्यांचे शिष्य हैदराबाद मुक्ती लढ्यात उतरले होते. सर्व संग्रामांचे हैदराबाद मुक्ती लढ्यात योगदान राहिले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याला नकार दिला होता. उलट निजामी संस्थान, भोपाळ, जुनागड, आझमगड आदी मुस्लिम संस्थानिकांना एकत्र करून त्याने पाकिस्तानशी संधान बांधले होते. भारतातली मुस्लिम संस्थाने आणि पाकिस्तान मिळून भारतीय संघराज्य व्यवस्थेला व्यवस्था पूर्ण खिळखिळी करण्याचे कारस्थान त्याने आखले होते.
परंतु, सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या दबावाला झुगारून पाकिस्तानचा विरोध धुडकावून लावून हैदराबाद संस्थानांमध्ये पोलीस ॲक्शन घेतली. प्रत्यक्षात त्यांनी भारतीय लष्कर हैदराबाद संस्थानात घुसवले आणि हैदराबाद संस्थान तीन दिवसात मुक्त केले. तिथली निजामाची इस्लामी रझाकारी राजवट संपुष्टात आणली. त्यामुळेच मोदी सरकारने संपूर्ण देशभर आता इथून पुढे 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App