पाकिस्तानातून हत्यारे आणून नुपूर शर्मा, टी. राजा सिंग यांच्यासह हिंदूने त्यांच्या हत्येचा कट; सुरत मधून मौलानाला अटक!!

Hindutva Leaders Threatened, Maulvi Arrested From Surat

विशेष प्रतिनिधी

सुरत : नुपूर शर्मा टी. राजा सिंग यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारा आणि त्यासाठी थेट पाकिस्तान मधून 1 कोटीची सुपारी देऊन हत्यारे मागवणार्‍या मौलानाला सुरत पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. Hindutva Leaders Threatened, Maulvi Arrested From Surat

लोकसभा निवडणूक भरात आली असताना हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलानाला अटक झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद सोहेल उर्फ ​मौलवी अबुबकर तेमोल (वय २७) अटे असे अटक झालेल्या मौलानाचे नाव असून त्याच्या मोबाईल चॅट वरून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी या संदर्भात तपशीलवार माहिती सांगितली. अटक करण्यात आलेला मौलवी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मौलानाने देशातील नुपूर शर्मा, टी. राजासह या हिंदू नेत्यांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी आणि पाकिस्तानातून शस्त्रे मागवल्याबद्दल त्याच्या मोबाइल फोनवरून झालेल्या चॅटही पोलिसांना मिळाले आहे.

मुलांना धार्मिक शिक्षणाचे काम

पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, मौलाना सोहेल अबूबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, मौलवीला सुरतच्या चौक बाजार परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सुरतमधील कामरेज भागातील कर्श गावचा रहिवासी आहे. आरोपी एका दौऱ्याच्या कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करतो आणि गावातील लहान मुलांना धार्मिक शिक्षण देतो. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता काही चॅटिंग आणि कॉल डिटेल्स सापडले.

धमकीचे चॅट

सुरतचे हिंदुत्व नेते उपदेश राणा यांनीही गेल्या महिन्यात धमक्या मिळाल्याची एफआयआर दाखल केली होती. मौलानाच्या कॉल डिटेल्समध्ये धमकीचे चॅटही आढळून आले आहे. आता सुरत गुन्हे शाखेचे पथक तपास करणार आहे. मौलानाने पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या नावाचे कोडवर्ड ठेवले. उपदेश राणा याला ढक्कन हे नाव ठेवले होते.

Hindutva Leaders Threatened, Maulvi Arrested From Surat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात